सिंधुदुर्गनगरीत विशेष आरोग्य शिबिराची पाहणी; गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेबाबत समाधान
सिंधुदुर्गनगरी, दि. २३ : स्वर्गीय उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आयोजित विशेष आरोग्य शिबिरांच्या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरविण्यात आलेल्या विशेष आरोग्य शिबिराची पाहणी करण्यात आली.



