दिल्लीतील एमएसएसआयडीसी कार्यालयाची उदय सामंत यांनी केली पाहणी

0
17
दिल्लीतील एमएसएसआयडीसी कार्यालयाची उदय सामंत यांनी केली पाहणी
दिल्लीतील एमएसएसआयडीसी कार्यालयाची उदय सामंत यांनी केली पाहणी

दिल्लीतील एमएसएसआयडीसी कार्यालयाची उदय सामंत यांनी केली पाहणी

महाराष्ट्रातील उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर

नवी दिल्ली, दि. २३ :
दिल्ली दौऱ्यादरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या विभागांतर्गत येणाऱ्या एमएसएसआयडीसी (MSSIDC) कार्यालयाला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्रातील बचत गट आणि मराठी उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना देशभरात हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

बैठकीत महाराष्ट्राची समृद्ध परंपरा जपत राज्यातील बचत गट, लघुउद्योजक आणि मराठी उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तूंना अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यात आला.
याशिवाय, केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या एमएसएसआयडीसीच्या इमारतीच्या आधुनिकीकरणासाठी (अपग्रेडेशन) आवश्यक निधी तातडीने मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे कार्यालयाच्या सुविधा अधिक सक्षम होऊन उद्योग व उद्योजकांना अधिक प्रभावी सेवा देता येणार असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीला एमएसएसआयडीसीच्या सौ. संगीता वराडे, श्री. अक्षय फाटक तसेच दिल्ली येथील महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी सौ. मनीषा पिंगळे यांच्यासह संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here