‘निरामय पंधरवाडा आरोग्य अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद

0
19
‘निरामय पंधरवाडा आरोग्य अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद
‘निरामय पंधरवाडा आरोग्य अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद

‘निरामय पंधरवाडा आरोग्य अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद

४३ शिबिरांत २,४६४ बालकांची आरोग्य तपासणी

सिंधुदुर्ग, दि. २३ :
मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम (RBSK), सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त समन्वयातून राबविण्यात आलेल्या ‘निरामय पंधरवाडा आरोग्य अभियानाला’ जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ७ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित ४३ विशेष आरोग्य शिबिरांमध्ये एकूण २,४६४ बालकांची सर्वंकष आरोग्य तपासणी करण्यात आली.

या अभियानांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालके व किशोरवयीन मुला-मुलींसाठी कुडाळ, कणकवली, वेंगुर्ला आणि देवगड तालुक्यांमध्ये विशेष आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. शिबिरांमध्ये बालकांमधील विविध आजार, जन्मजात दोष, पोषणासंबंधी समस्या तसेच इतर आरोग्यविषयक बाबींची तपासणी करण्यात आली.
आरोग्य तपासणीनंतर आवश्यकतेनुसार बालकांना पुढील उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तसेच संदर्भ (रेफरल) सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या अभियानामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील बालकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आणि तज्ज्ञ आरोग्य सेवा मिळाली.
या उपक्रमाला पालकांनीही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आपल्या पाल्यांची आरोग्य तपासणी करून घेतली. बालकांचे आरोग्य अधिक सक्षम व निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभाग, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम (RBSK), स्थानिक प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनी मोलाचे योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here