रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेचा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात
रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेचा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात
दापोली | प्रतिनिधी -अरविंद अनंत मांडवकर
शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री मा. रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना, दापोली तालुक्याच्या वतीने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. “एक झाड लावा, पर्यावरण वाचवा” हा संदेश देत युवासैनिकांनी निसर्ग संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश
युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पर्यावरण मंत्री म्हणून कार्यरत असताना मा. रामदासभाई कदम यांनी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि नैसर्गिक संपत्तीच्या जतनासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
या उपक्रमात युवासेना उपजिल्हा युवाअध्यक्ष अमित पारदुले, तालुका युवाअध्यक्ष सुमित जाधव, उपतालुका युवाअध्यक्ष रोहन तोडणकर, विभाग युवाअध्यक्ष विनय शेडगे, स्वप्निल चिपळूणकर, रोशन करबेले, जयराज खोपकर, मनोज गोरीवले, शाखाप्रमुख गुरुदास सवणसकर तसेच अन्य शिवसैनिक आणि युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरातील नागरिकांकडूनही कौतुकास्पद ठरला.