Kokan: पत्नीस मुलबाळ होत नसल्याने वारस मिळावा म्हणून रचला अघोरी पूजेचा घाट !

0
16
पत्नीस मुलबाळ होत नसल्याने वारस मिळावा म्हणून रचला अघोरी पूजेचा घाट !

⭐पोलिसांना कळताच सर्व आरोपींना टाकले आत ⭐कुडाळ हिर्लोक येथील संशयास्पद घटना,पुजेच्या साहीत्या सह कोयता सुरी पोलिसांनी केली जप्त

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कुडाळ –

कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिलोंक आंबेडकरवाडी येथील विशाल विजय जाधव नामक इसमाच्या राहत्या घरात काहीतरी संशयास्पद हालचाली असून घरात कोणतीतरी जादुटोणा करणारी अघोरी कृती चालल्याचा दाट संशय आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-चित्रकला-स्पर्धेत-काशिन/

अशी माहीती पोलिसांना मिळाल्यान पोलीस हवालदार मंगेश जाधव यांनी हिर्लोक- आंबेडकरवाडी येथे विशाल विजय जाधव याच्या राहते घरात जाऊन खातरजमा केली त्यावेळी घरात सुमारे 4 X 4 X 8 लांबी-रुंदी आणि खोलीचा खड्डा खणलेला आढळला. अनिष्ट प्रथेचा वापर करुन जादूटोणा करणारे साहीत्य सुद्धा आढळून आले. यामध्ये लिंबू, पान सुपारीचे विडे, हळद, पिंजर, नारळ, फळे, फुले, तिळ, बर्फीचे पुडे, पणत्या, अबीर, डमरु, रुद्राक्ष माळ, चामड्याचे छोटे चप्पल जोड, पांढरे कापड, गांधी टोप्या, बाजूला छोटया काठ्या, कांबळी घोंगड्याचे तुकडे, कवडे, बिब्बे अशा साहित्याची मांडणी करुन नरबळी अगर अन्य कोणत्या तरी अघोरी कृतीकरीता कोयता आणि सूरी अशी हत्यारे मांडणी केलेल्या स्थितीत दिसून आली.

आवळेगाव दूरक्षेत्राच्या पोलिसांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना हि हकीगत कळवली. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, पोलीस हवालदार कृष्णा केसरकर, प्रितम कदम, अनिल पाटील, महीला पोलीस ज्योती रायशिरोडकर यांनी घटनास्थळी जाऊन वस्तूस्थितीची खात्री केली. त्यावेळी घरात असलेले आरोपीत क्र. १ विशाल विजय जाधव (वय 30 वर्षे, रा. घर नं 353, हिर्लोक आंबेडकरवाडी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग सद्या रा रु.नं. 1, काजोळकर हाऊस, राजश्री प्लाम्सचे बाजूला धोबीबाळी, ठाणे (पश्चिम)) आरोपीत क्र. २. सुस्मित मिलींद गमरे (वय 33 वर्षे रा. मु.पो. पातेपिलवली, धर्मवीर नगर, साईनिवास सोसायटी, विनं 9, रु.नं 709, ता. चिपळूण जि. रत्नागिरी), आरोपीत क्र. ३ सौ. हर्षाली विशाल जाधव पुर्वाश्रमीची समृध्दी अविनाश हडकर, (वय 35 वर्षे रा. घर नं. 353, हिलोंक आंबेडकरवाडी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग, सद्या रा. रुनं ।, काजोळकर हाऊस, राजश्री प्लाम्सचे बाजूला धोबीबाळी, ठाणे -वय 32 वर्षे रा. उसरघरगांव, मानपाडा, दिवारोड, डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे) व आरोपीत क्र. ५ दिनेश बालाराम पाटील (वय 34 वर्षे रा उसरघरगांव, मानपाडा, दिवारोड, डोंबिवली (पुर्व), जि. ठाणे) हे मिळून आले.

त्यांचेकडे एवढा मोठा खड्डा खोदण्याचे कारण बिचारता विशाल विजय जाधव याचे घरास गृहदोष असल्याने तसेच त्याचे पत्नीस मुलबाळ होत नसल्याने त्यांची पिडा दूर करण्यासाठी सदरची अघोरी पूजा केल्याचे सांगितलेले आहे. परंतु ते समाधानकारक माहीती देत नाहीत, गुन्हयाचे सखोल अन्वेषणाकरीता नमुद सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली असून आरोपींनी घटनास्थळी येण्या जाण्याकरीता वापरलेली इको कार क्र. MH 05 EV 6561 ही जप्त करण्यात आलेली आहे. पोलीस हवालदार मंगेश जाधव यांनी सदरबाबत फिर्याद दिलेली आहे. अधिक तपास स्वतः पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here