एमएच-सीईटी 2026-27 – ललित कला (Fine Art) प्रवेशासाठी मॉप-अप फेरी जाहीर

0
4
एमएच-सीईटी 2026-27 - ललित कला (Fine Art) प्रवेशासाठी मॉप-अप फेरी जाहीर
एमएच-सीईटी 2026-27 - ललित कला (Fine Art) प्रवेशासाठी मॉप-अप फेरी जाहीर

एमएच-सीईटी 2026-27 – ललित कला (Fine Art) प्रवेशासाठी मॉप-अप फेरी जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) कक्षाने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी ललित कला (Fine Art) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतील मॉप-अप फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रवेशासाठी पात्र उमेदवारांना रिक्त जागांवर प्रवेश मिळविण्याची ही अंतिम संधी असणार आहे.
ललित कला प्रवेश, कॅप राऊंडचे वेळापत्रक, कॅप राऊंड I आणि कॅप राऊंड II
ललित कला प्रवेश, कॅप राऊंडचे वेळापत्रक, कॅप राऊंड I आणि कॅप राऊंड II
मॉप-अप फेरीचे वेळापत्रक
उपक्रम
दिनांक
मॉप-अप फेरी रिक्त जागा जाहीर
14 ऑगस्ट 2026
मॉप-अप फेरी अर्ज प्रक्रिया
15 ते 19 ऑगस्ट 2026
मॉप-अप फेरी गुणवत्ता यादी
20 ऑगस्ट 2026
मॉप-अप फेरी प्रवेश वाटप (जे. जे. कॅम्पस)
21 ऑगस्ट 2026
महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया
24, 25 व 27 ऑगस्ट 2026
याशिवाय संस्थास्तरीय रिक्त जागांची घोषणा 24 ऑगस्ट रोजी करण्यात येणार असून, संस्थास्तरीय अर्ज व प्रवेश प्रक्रिया 24 ते 28 ऑगस्टदरम्यान होणार आहे.
जम्मू-काश्मीर व लडाख येथील स्थलांतरित उमेदवारांची यादी 4 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांसाठी समुपदेशन प्रक्रिया 11 ऑगस्ट रोजी होईल, तर प्रवेश प्रक्रिया 11 ते 13 ऑगस्टदरम्यान पार पडणार आहे.
प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
MAHACET अधिकृत संकेतस्थळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here