ठाण्यातील ‘स्वयम’ या बहुविकलांग मुलांचे पुनर्वसन दिव्यांग व्यक्तींसाठी फिरते वैद्यकीय सुविधा केंद्राचे लोकार्पण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
9
ठाण्यातील 'स्वयम' या बहुविकलांग मुलांचे पुनर्वसन दिव्यांग व्यक्तींसाठी फिरते वैद्यकीय सुविधा केंद्राचे लोकार्पण - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
ठाण्यातील 'स्वयम' या बहुविकलांग मुलांचे पुनर्वसन दिव्यांग व्यक्तींसाठी फिरते वैद्यकीय सुविधा केंद्राचे लोकार्पण - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

ठाण्यातील ‘स्वयम’ या बहुविकलांग मुलांचे पुनर्वसन दिव्यांग व्यक्तींसाठी फिरते वैद्यकीय सुविधा केंद्राचे लोकार्पण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाण्यातील स्वयम या बहुविकलांग मुलांचे पुनर्वसन केंद्राला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या संस्थेने राज्यभरातील दिव्यांग व्यक्तींसाठी फिरते वैद्यकीय सुविधा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर या सुविधा फिरते वैद्यकीय सुविधा केंद्राचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणाऱ्या अनेक दिव्यांग व्यक्तींना उपचार, प्रमाणपत्रे, सरकारी सुविधा आणि पुनर्वसन सेवा मिळविण्यासाठी वारंवार शहरात प्रवास करावा लागतो. अनेक कुटुंबांसाठी हा प्रवास शारीरिकदृष्ट्या कठीण आणि आर्थिकदृष्ट्याही परवडणारा नसतो. विशेषतः मोठ्या वयाच्या दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक वाहतुकीने उपचार केंद्रात ने-आण करणे अनेक पालकांसाठी अशक्य होते. याच समस्येवर उपाय म्हणून स्वयम संस्थेने “दिव्यांगांसाठी फिरते वैद्यकीय सुविधा केंद्र” सुरू केले आहे.
या प्रकल्पाचा माध्यमातून राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गावाजवळच आवश्यक वैद्यकीय, पुनर्वसन आणि मार्गदर्शनाच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांचा मनोसामाजिक आणि आर्थिक ताण कमी होईल. आज या सुविधा केंद्राचे उद्घाटन करून त्याची पाहणी करत या केंद्राचे काम जाणून घेतले.
यावेळी स्वयम बहुविकलांग संस्थेच्या संचालिका नीता देवळालकर, राजीव देवळालकर, श्रेया देवळालकर तसेच शिवसेना पक्षाचे अमित लोटलीकर, बालाजी पाटील खतगावकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here