कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज नोंदणीस मुदतवाढ
कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज नोंदणीस मुदतवाढ
विद्यार्थ्यांना दिलासा; अर्ज भरण्याची अंतिम तारीख आता 31 जुलै 2026
मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीच्या कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज नोंदणीची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
उमेदवारांच्या हिताचा विचार करून केंद्रीकृत प्रवेश नोंदणी (CAP Registration) तसेच केंद्रीकृत प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आणखी संधी उपलब्ध झाली आहे.
सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, मत्स्यव्यवसाय, वनीकरण तसेच इतर कृषी संलग्न पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मुदतवाढ महत्त्वाची ठरणार आहे.
प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती, पात्रता निकष आणि अर्ज नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.