कुंभवे शाळेत गुरुवंदना

0
4
कुंभवे शाळेत गुरुवंदना
कुंभवे शाळेत गुरुवंदना

कुंभवे शाळेत गुरुवंदना

दापोली-
प्रत्येक विद्यार्थ्याच्या अथवा व्यक्तिच्या आयुष्यात गुरूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ‘गुरुविन जगीं थोर काय?’ हे खरेच आहे. अशा गुरुंप्रति आदर व कृतज्ञता व्यक्त करताना गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद जीवन शिक्षण आदर्श शाळा कुंभवे येथे सर्व विद्यार्थ्यांकडून शाळेतील सर्व गुरुवर्यांप्रति गुरुपाद्यपूजन तसेच गुरुवंदनेचे समारंभपूर्वक आयोजन करण्यात आले होते.
कुंभवे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील गुरुवर्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करताना छोटी भेटवस्तू तसेच स्वनिर्मित शुभेच्छाकार्ड अर्पण करुन अनोखी गुरुवंदना सादर केली. गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेत महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कुंभवे शाळेतील कु. माही गोरीवले, कु. आकांक्षा झाडेकर, कु. स्वरा जाधव, कु. पुर्वा झाडेकर, कु. आरोही कुळे, कु. शर्वरी पिंपळकर, कु. कस्तुरी झाडेकर, कु. प्रांजल शिगवण, कु. खुशी डीके, कु. हर्ष लाईनकर, कु. अन्वी कुळे आदी बालकांनी आपल्या मधुर वाणीतील छोट्या भाषणांनी शाळेतील सर्व गुरुवर्यांची मने जिंकली.
कुंभवे शाळेत साजऱ्या झालेल्या गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीतील कु. माही गोरीवले व कु. आकांक्षा झाडेकर यांनी केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका ज्योती पवार यांच्यासह सुनंदा मळगे, पूनम चौधरी, प्रतिक्षा झाडेकर, बाबू घाडीगांवकर, कोमल मुरुडकर आदींनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here