IR 2026 : मतदार नोंदणीबाबत महत्त्वाची सूचना; जुळवणी (Mapping) न झाल्यास घाबरू नका

0
6

मुंबई :
विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (SIR) 2026 प्रक्रियेदरम्यान एखाद्या मतदाराची किंवा त्याच्या आई-वडील अथवा आजी-आजोबांच्या तपशीलाशी जुळवणी (Mapping) झाली नसल्यास संबंधित मतदारांनी कोणतीही चिंता करू नये, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अशा मतदारांना नोंदणीची संधी उपलब्ध राहणार असून त्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागणार आहे.
मतदारांनी काय करावे?
🔹 भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या यादीतील कोणतेही एक वैध कागदपत्र तयार ठेवावे.
🔹 प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर (ऑगस्ट 2026) संबंधित मतदार फॉर्म क्रमांक 6 भरून मतदार नोंदणी अथवा आवश्यक दुरुस्तीसाठी अर्ज करू शकतात.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, मतदारांच्या नावांची किंवा कौटुंबिक तपशीलांची जुळवणी न झाल्यामुळे कोणत्याही पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क बाधित होणार नाही. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे नियमानुसार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
मतदारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचा आधार घ्यावा आणि आवश्यक असल्यास संबंधित बीएलओ, तहसील कार्यालय किंवा निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here