कासारवडवली पोलिसांचा सायबर गुन्हे, अंमली पदार्थविरोधी मोहिमेबाबत जनजागृती उपक्रम

0
7

ठाणे :
कासारवडवली पोलीस ठाणे आणि Eagle Brigade Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने जी कॉर्प कॉन्सन्ट्रेक मल्टिनॅशनल कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात सायबर गुन्हे, डिजिटल अरेस्ट, ऑनलाइन फसवणूक, नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) कायदा, आपत्कालीन सेवा डायल 112 तसेच अंमली पदार्थविरोधी जनजागृती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
तज्ज्ञांनी वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले. ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, ओटीपी शेअरिंग आणि डिजिटल अरेस्टसारख्या नव्या प्रकारच्या फसवणुकींपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली.
याशिवाय अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्तीचे महत्त्व तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानामुळे होणारे आरोग्यविषयक आणि सामाजिक परिणाम याविषयीही जनजागृती करण्यात आली.
सुरक्षित नागरिक आणि सुरक्षित समाज घडविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमास कंपनीचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.
“सुरक्षित नागरिक, सुरक्षित समाज” हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here