माजी सैनिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी खेड व चिपळूण येथे ऑगस्टमध्ये सैनिक कल्याण संघटकांचे दौरे
माजी सैनिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी खेड व चिपळूण येथे ऑगस्टमध्ये सैनिक कल्याण संघटकांचे दौरे
पेन्शन, रेकॉर्ड ऑफिस, महासैनिक पोर्टल नोंदणीसह विविध समस्यांचे होणार निराकरण
रत्नागिरी :
जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, वीर नारी, वीर माता आणि वीर पिता यांच्या विविध समस्या व अडचणी सोडवण्यासाठी ऑगस्ट २०२६ महिन्यात खेड आणि चिपळूण तालुक्यांमध्ये सैनिक कल्याण संघटकांचे दौरे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.
या दौऱ्यांदरम्यान माजी सैनिकांना भेडसावणाऱ्या पेन्शन, रेकॉर्ड ऑफिस, महासैनिक पोर्टलवरील नोंदणी तसेच इतर प्रशासकीय समस्यांचे मार्गदर्शन व निराकरण करण्यात येणार आहे.
दौऱ्यांचे वेळापत्रक
३ ऑगस्ट (सोमवार) – सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड कल्याण संघटक : अनिल मोरबाळे
४ ऑगस्ट (मंगळवार) – सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण कल्याण संघटक : अनिल मोरबाळे
१० ऑगस्ट (सोमवार) – सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड कल्याण संघटक : राहुल काटे
११ ऑगस्ट (मंगळवार) – सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण कल्याण संघटक : राहुल काटे
१७ ऑगस्ट (सोमवार) – सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड अ. शा. कल्याण संघटक : सुनिल कदम
१८ ऑगस्ट (मंगळवार) – सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण अ. शा. कल्याण संघटक : सुनिल कदम
२४ ऑगस्ट (सोमवार) – सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड कल्याण संघटक : अनिल मोरबाळे
२५ ऑगस्ट (मंगळवार) – सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण कल्याण संघटक : अनिल मोरबाळे
या सेवांचा मिळणार लाभ
दौऱ्यांमध्ये पुढील विषयांवर मार्गदर्शन व समस्या निराकरण केले जाणार आहे :
रेकॉर्ड ऑफिस (Record Office) विषयक प्रश्न
पेन्शन संदर्भातील अडचणी
महासैनिक पोर्टलवरील नवीन नोंदणी
विविध शासकीय योजनांबाबत माहिती
इतर प्रशासकीय व वैयक्तिक समस्या
आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत
माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी खालील कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रती सोबत आणाव्यात :
महासैनिक पोर्टल नोंदणी पावती
डिस्चार्ज बुक (Discharge Book)
पीपीओ (PPO) प्रत
पॅन कार्ड
बँक पासबुक
ECHS कार्ड
आधार कार्ड
आधारशी संलग्न असलेला चालू मोबाईल क्रमांक
जिल्ह्यातील सर्व पात्र माजी सैनिक, वीर नारी, वीर माता, वीर पिता आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या जवळच्या केंद्रावर निश्चित तारखेला उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.