आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आयकर विवरणपत्र (Income Tax Return – ITR) दाखल करण्याचा आज (३१ जुलै) शेवटचा दिवस असून, करदात्यांनी विलंब टाळून त्वरित आपले विवरणपत्र सादर करावे, असे आवाहन आयकर विभागाने केले आहे.
मूल्यांकन वर्ष २०२६-२७ साठी देशभरातून आतापर्यंत ५.५ कोटींहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ३० जुलै रोजी एका दिवसातच ४२ लाखांहून अधिक आयटीआर दाखल झाल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे.
करदात्यांनी घाईगडबड न करता आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून अचूक माहितीच्या आधारे विवरणपत्र भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. “आताच दाखल करा, शांतपणे दाखल करा” हा संदेश देत आयकर विभागाने नागरिकांना अंतिम मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
आयकर विवरणपत्र भरण्यासाठी करदाते अधिकृत आयकर पोर्टलला भेट देऊ शकतात.