भारतीय बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन यांनी ग्लासगोतील रेस्टॉरंटमध्ये भारताच्या अपूर्ण नकाशावर घेतला आक्षेप
भारतीय बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन यांनी ग्लासगोतील रेस्टॉरंटमध्ये भारताच्या अपूर्ण नकाशावर घेतला आक्षेप
ग्लासगो, दि. २ :
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकलेल्या भारतीय बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन यांनी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे भारताच्या अपूर्ण नकाशावर आक्षेप घेत जागरूक नागरिकत्वाचे उदाहरण घालून दिले.
भारतीय बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन यांनी ग्लासगोतील रेस्टॉरंटमध्ये भारताच्या अपूर्ण नकाशावर घेतला आक्षेप
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय खेळाडू ग्लासगोमधील ‘मिस्टर सिंग्स इंडिया’ या रेस्टॉरंटमध्ये गेले होते. यावेळी रेस्टॉरंटमध्ये वापरण्यात येणाऱ्या नॅपकिनवर छापलेल्या भारताच्या नकाशामध्ये ईशान्य भारताचा भाग दर्शविण्यात आलेला नसल्याचे लव्हलिना यांच्या निदर्शनास आले.
तसेच नकाशात जम्मू आणि काश्मीरचा भागही अपूर्ण स्वरूपात दाखविण्यात आल्याचे त्यांनी पाहिले. यानंतर लव्हलिना यांनी नम्रपणे रेस्टॉरंट व्यवस्थापनाचे लक्ष या त्रुटीकडे वेधले आणि नकाशा योग्य स्वरूपात दुरुस्त करण्याची विनंती केली.
त्यांच्या या कृतीचे भारतीय खेळाडूंसह अनेकांकडून कौतुक होत आहे. परदेशात असतानाही देशाच्या अस्मितेशी निगडित बाबींविषयी जागरूक राहून योग्य पद्धतीने आपली भूमिका मांडणे ही भारतीय संस्कृतीची आणि जबाबदार नागरिकत्वाची ओळख असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.