महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनकडून २०२६-२७ साठी RIN नोंदणी सुरू
महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनकडून २०२६-२७ साठी RIN नोंदणी सुरू
मुंबई, दि. २ :
महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन (CAM) ने २०२६-२७ या वर्षासाठी रायडर आयडेंटिफिकेशन नंबर (RIN) नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यातील सायकलपटूंना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी RIN क्रमांक अनिवार्य असल्याची माहिती असोसिएशनने दिली आहे.
महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन तसेच तिच्याशी संलग्न संस्थांमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रत्येक सायकलपटूकडे वैध RIN असणे आवश्यक आहे. त्यामुळे इच्छुक खेळाडूंनी नोंदणी करण्यापूर्वी असोसिएशनने जारी केलेले परिपत्रक काळजीपूर्वक वाचून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विक्रम रोठे आणि सचिव प्रा. संजय साठे यांनी राज्यातील सर्व सायकलपटूंना वेळेत RIN नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
RIN नोंदणीमुळे खेळाडूंची अधिकृत ओळख निश्चित होण्यास मदत होणार असून राज्यातील सायकलिंग स्पर्धांचे व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि पारदर्शक होणार आहे.