एमआयडीसीच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त औद्योगिक विकासाचा गौरव

0
19
एमआयडीसीच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त औद्योगिक विकासाचा गौरव
एमआयडीसीच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त औद्योगिक विकासाचा गौरव

एमआयडीसीच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त औद्योगिक विकासाचा गौरव

मुंबई, दि. २ :
महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास उद्योगमंत्री उदय सामंत प्रमुख उपस्थित होते.

यावेळी एमआयडीसीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना मंत्री सामंत यांनी महाराष्ट्र आज देशातील औद्योगिक क्षेत्रात अग्रस्थानी असल्याचे सांगितले. या यशाचे श्रेय एमआयडीसीच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणांना, कार्यक्षम अधिकाऱ्यांना आणि समर्पित कर्मचाऱ्यांना जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करून अत्याधुनिक उद्योग उभारणे आणि त्यातून युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हे महायुती सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्र आणि युवकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
महाराष्ट्राला राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक स्तरावरील औद्योगिक महासत्ता बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, वर्षा ठाकूर-घुगे, अजित कुंभार, एमआयडीसी एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष विलास शंखे, एमआयडीसी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष के. बी. पाटील, एमआयडीसी एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस राजेंद्र मुमनकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, उद्योजक आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here