बिपीनदादा पाटणे यांना प्रतिष्ठेचा ‘उद्योग भूषण’ पुरस्कार; शिक्षण, उद्योग आणि समाजसेवेला मानाचा मुजरा

0
31
बिपीनदादा पाटणे यांना प्रतिष्ठेचा 'उद्योग भूषण' पुरस्कार
बिपीनदादा पाटणे यांना प्रतिष्ठेचा 'उद्योग भूषण' पुरस्कार

 बिपीनदादा पाटणे यांना प्रतिष्ठेचा ‘उद्योग भूषण’ पुरस्कार; शिक्षण, उद्योग आणि समाजसेवेला मानाचा मुजरा

दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
शिक्षण, उद्योग आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटविणारे रोटरी प्रतिष्ठान, खेडचे माजी अध्यक्ष तथा दीप एंटरप्रायझेसचे संचालक श्री. बिपीनदादा पाटणे यांना कोकणस्थ (संगमेश्वरी) वैश्य समाजाच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘उद्योग भूषण’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
शिक्षण, उद्योग आणि समाजसेवेला मानाचा मुजरा
शिक्षण, उद्योग आणि समाजसेवेला मानाचा मुजरा
मुंबई येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात १ ऑगस्ट रोजी आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय यश, समाजाप्रती असलेली बांधिलकी तसेच शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
रोटरी प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष म्हणून बिपीनदादा पाटणे यांनी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेडच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टीने नेतृत्व केले. आधुनिक शैक्षणिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने शैक्षणिक, क्रीडा तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हा व राज्य स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली.
उद्योग क्षेत्रात दीप एंटरप्रायझेसच्या माध्यमातून गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि नावीन्यपूर्ण कार्यपद्धतीचा आदर्श निर्माण करणाऱ्या बिपीनदादा पाटणे यांनी सामाजिक क्षेत्रातही अनेक लोकहिताचे उपक्रम राबवून समाजाशी असलेली आपली बांधिलकी जपली आहे. शिक्षण, उद्योग आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांतील त्यांच्या समर्पित व प्रेरणादायी कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘उद्योग भूषण’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल रोटरी स्कूलचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बिपीनदादा पाटणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.
हा सन्मान केवळ बिपीनदादा पाटणे यांच्या वैयक्तिक कार्याचा गौरव नसून शिक्षण, उद्योग आणि समाजसेवा या क्षेत्रांत सातत्याने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला मिळालेली योग्य पोचपावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here