झाडं लावा, निसर्ग वाचवा" - वालावलच्या युवा संघर्ष मित्रमंडळाचा कौतुकास्पद उपक्रम
”झाडं लावा, निसर्ग वाचवा” – वालावलच्या युवा संघर्ष मित्रमंडळाचा कौतुकास्पद उपक्रम
अधिकृत आणि प्रभावी विकासासोबत वृक्षसंवर्धनही! वालावल युवा संघर्ष मित्रमंडळाचा आदर्श उपक्रम-सौ. अर्चना बंगे
वालावल पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे यांनी युवा मंडळाच्या कार्याचे केले कौतुक
कुडाळ, प्रतिनिधी
आजच्या धावपळीच्या काळात विकासाबरोबर निसर्गाचाही विचार करणारे युवक म्हणजे वालावल गावातील युवा संघर्ष मित्रमंडळ. आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाचे औचित्य साधून या मंडळाने गावात भव्य वृक्षारोपण मोहीम*हाती घेऊन सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श घालून दिला आहे.
वालावल गावातील महत्वाच्या ठिकाणी सिताफळ, आंबा, कडुलिंब, बेल, बकुळ, अशोक आणि विविध औषधी झाडांचीलागवड करून या युवकांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घेतला.
या उपक्रमाला भेट देण्यासाठी आलेल्या वालावल पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे यांनी युवा मंडळाच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.
“वालावल गावातील युवा वर्गाने गावच्या विकासाबरोबरच निसर्गाचा सहवास तेवढाच महत्त्वाचा असल्याचे दाखवून दिले. सामाजिक कामाचा असा पुढाकार घेणे खरोखरच कौतुकास्पद आहे. कु. पूजा राऊळ, सागर पाटकर, हेमंत वालावलकर आणि सर्व युवा कार्यकर्ते विकासात्मक कामांसाठी नेहमीच पुढे असतात. या सर्वांचे मनापासून अभिनंदन” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी देखील या उपक्रमाला भेट देऊन युवकांचे प्रोत्साहन केले.
या वृक्षारोपणात करुण राऊळ, भाग्यश्री राऊळ, विशाल राऊळ, अभय मांजरेकर, अक्षय सारंग, योगेश वालावलकर, गौरव पेडणेकर, आपा वालावलकर, बाळा पार्सेकर यांच्यासह मोठ्या संख्येने युवा सहभागी झाले होते. आज जिथे सगळे फक्त मोबाईल आणि स्वार्थात अडकले आहेत, तिथे वालावलच्या या युवकांनी “मैत्री फक्त माणसांशीच नाही, तर निसर्गाशीही असावी” हा संदेश देऊन संपूर्ण तालुक्याला प्रेरणा दिली आहे.
खरोखरच… आजचा युवा जर असा असेल तर आपल्या गावाचं आणि निसर्गाचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे