दि. बा. पाटील यांच्या नावासाठी केंद्राकडे आग्रही पाठपुरावा – खासदार बाळ्या मामा

0
10
दि. बा. पाटील यांच्या नावासाठी केंद्राकडे आग्रही पाठपुरावा - खासदार बाळ्या मामा
दि. बा. पाटील यांच्या नावासाठी केंद्राकडे आग्रही पाठपुरावा - खासदार बाळ्या मामा

दि. बा. पाटील यांच्या नावासाठी केंद्राकडे आग्रही पाठपुरावा – खासदार बाळ्या मामा

नवी मुंबई
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला “लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे नामकरण करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने तातडीने मंजुरी द्यावी, या मागणीसाठी भिवंडीचे खासदार बाळ्या मामा यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांची संसदेतील सहकारी खासदारांसमवेत भेट घेतली. यावेळी त्यांनी मंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर केले.
यावेळी खासदार बाळ्या मामा म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देणे ही केवळ भूमिपुत्रांची मागणी नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि भावनांशी निगडित बाब आहे. स्व. दि. बा. पाटील यांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी आणि भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी संघर्ष केला असून त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून विमानतळाला त्यांचे नाव देणे आवश्यक आहे.
या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेत लवकरात लवकर अंतिम मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here