‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत मुलींच्या हॉकीसाठी ७ ऑगस्टला बालेवाडीत निवड चाचणी; रत्नागिरीतील खेळाडूंना सहभागाचे आवाहन

0
9

रत्नागिरी, दि. ६ ऑगस्ट :
राज्यातील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन लक्ष्यवेध’ उपक्रमांतर्गत पुणे विभागस्तरीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी हॉकी (मुली) खेळाची निवड चाचणी शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही निवड चाचणी शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे सकाळी १० वाजता होणार असून रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र महिला खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
यापूर्वी २३ व २४ मार्च २०२६ रोजी ॲथलेटिक्स, शुटींग, रोईंग, कुस्ती, टेबल टेनिस आणि हॉकी या खेळांसाठी निवड चाचणी घेण्यात आली होती. मात्र, हॉकी (मुली) या प्रकाराला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही विशेष पुनर्निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.
पात्रता व अर्हता :
निवड चाचणीसाठी संबंधित खेळाडूचे वय ३१ डिसेंबर रोजी २५ वर्षांपेक्षा कमी असावे. तसेच अधिकृत राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतलेला असावा किंवा राज्यस्तरीय स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेले असावे.
आवश्यक कागदपत्रे :
खेळाडूंनी निवड चाचणीसाठी येताना जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (एलसी), अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे आणि शाळा किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र यांच्या मूळ प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच स्वतःचे क्रीडा साहित्यही सोबत असणे बंधनकारक आहे.
निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंना निवास व भोजनाची व्यवस्था स्वतः करावी लागणार आहे.
‘मिशन लक्ष्यवेध’ उपक्रम राज्यातील क्रीडा प्रशिक्षण व्यवस्था सक्षम करणे, पायाभूत सुविधा विकसित करणे, खेळाडूंना प्रोत्साहन देणे, करिअर मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी निर्माण करणे या उद्देशाने राबविण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुक खेळाडूंनी वैशाली सूळ (७४४७४९१८८८) किंवा विवेंडा डिकोस्टा (९८२३९३२०९७) यांच्याशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here