‘कॅप्चर महाराष्ट्र महामान्सून’ स्पर्धा

0
7
‘कॅप्चर महाराष्ट्र महामान्सून’ स्पर्धा; पावसाळी महाराष्ट्राचे सौंदर्य कॅमेऱ्यात टिपण्याची सुवर्णसंधी
‘कॅप्चर महाराष्ट्र महामान्सून’ स्पर्धा; पावसाळी महाराष्ट्राचे सौंदर्य कॅमेऱ्यात टिपण्याची सुवर्णसंधी

‘कॅप्चर महाराष्ट्र महामान्सून’ स्पर्धा

पावसाळी महाराष्ट्राचे सौंदर्य कॅमेऱ्यात टिपण्याची सुवर्णसंधी

मुंबई, दि. ६ ऑगस्ट :
महाराष्ट्राच्या निसर्गरम्य पावसाळी सौंदर्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याची संधी महाराष्ट्र पर्यटन विभागाने उपलब्ध करून दिली आहे. ‘कॅप्चर महाराष्ट्र महामान्सून’ या छायाचित्रण आणि रिल्स स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारांना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये निसर्ग, वन्यजीव, किल्ले-लेणी-शिल्प यांसारखी वारसास्थळे, संस्कृती आणि आध्यात्मिक पर्यटन अशा विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या पावसाळी पर्यटन स्थळांचे सौंदर्य छायाचित्रे आणि रिल्सच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली असून प्रथम क्रमांकासाठी ₹२५,०००, द्वितीय क्रमांकासाठी ₹१५,००० आणि तृतीय क्रमांकासाठी ₹१०,००० इतकी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here