महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटलसह राज्यातील 10 नव्या दंत शल्यक्रिया व नवजात शिशु अतीव दक्षता विभागांचे उद्घाटन

0
8

मुंबई :
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री Prakash Abitkar यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत परळ येथील Mahatma Gandhi Memorial Hospital तसेच राज्यातील 10 नव्याने सुरू करण्यात आलेल्या दंत शल्यक्रिया विभाग आणि नवजात शिशु अतीव दक्षता विभागांचे (NICU) उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना मंत्री आबिटकर यांनी राज्यातील सर्वसामान्य नागरिक, कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. आरोग्य सुविधांचा विस्तार ही काळाची गरज असून नव्याने सुरू करण्यात आलेले दंत शल्यक्रिया विभाग आणि NICU रुग्णांसाठी मोठे वरदान ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेषतः नवजात बालकांना तातडीचे आणि गुणवत्तापूर्ण उपचार स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार असल्याने बालमृत्यूदर कमी करण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मंत्री आबिटकर यांनी महत्त्वाची घोषणा करताना सांगितले की, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यातील सर्व रुग्णालयांची माहिती 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना विविध आरोग्य सुविधा, उपचार व्यवस्था आणि उपलब्ध सेवांची माहिती एका क्लिकवर मिळू शकेल.
कार्यक्रमात आमदार Chitra Wagh यांनी मनोगत व्यक्त केले, तर आमदार Seema Hire यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदविला. राज्य कामगार विमा सोसायटीचे संचालक अशोक थोरात यांनी प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमास राज्य कामगार विमा सोसायटीचे आयुक्त रमेश चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी फाळके, नगरसेवक किरण तावडे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here