देवगड आनंदवाडीतील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताह; नितेश राणे यांनी घेतले दर्शन

0
8

देवगड | प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील आनंदवाडी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहानिमित्त राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन विठ्ठल-रखुमाईचे मनोभावे दर्शन घेतले.

हरिनाम सप्ताहामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून भाविकांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावेळी नितेश राणे यांनी श्री विठ्ठल-रखुमाई चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
या प्रसंगी माजी आमदार अजित गोगटे, बाळ खडपे, विठ्ठल-रखुमाई मंदिर मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कोयंडे, योगेश चांदोसकर, वैभव करगुटकर, दयानंद पाटील, प्रकाश राणे, शरद ठूकरुल, तनवी चांदोस्कर, बुवा तारी तसेच इतर नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरिनाम सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि नामस्मरणाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here