पनवेलच्या रोनक जितेकरचा राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णवेध; दोन राष्ट्रीय विक्रमांची नोंद

0
13

पनवेल | प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील दापोली गावच्या १६ वर्षीय रोनक रोशन जितेकरने राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत दोन नवीन राष्ट्रीय विक्रमांसह सुवर्णपदक पटकावले आहे. हैदराबाद येथील गचीबोवली स्टेडियमवर आयोजित नॅशनल सबज्युनिअर पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२६ मध्ये त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली.

१०५ किलो वजनी गटात झालेल्या अटीतटीच्या स्पर्धेत रोनकने तब्बल २८८.५ किलो वजन उचलून दोन राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केले. या यशामुळे त्याची आगामी आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी थेट निवड झाली असून, वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणारा तो रायगड जिल्ह्यातील पहिला खेळाडू ठरला आहे.
रोनकला राष्ट्रीय खेळाडू विशाल मुळ्ये यांचे विशेष प्रशिक्षण लाभत असून त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, कर्जतच्या आयएनडी क्लबची गायत्री बडेकर हिने ४७ किलो सबज्युनिअर गटात ३७८.५ किलो एकूण वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. तिने स्क्वॅट आणि डेडलिफ्ट प्रकारात राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली असून तिला ‘स्ट्राँग वुमन ऑफ इंडिया – सबज्युनिअर’ हा मानाचा किताबही मिळाला.
तसेच जिज्ञासा बडेकर हिने ६९ किलो सबज्युनिअर गटात ३१२.५ किलो वजन उचलून कांस्यपदकाची कमाई केली.
या सर्व खेळाडूंच्या यशाबद्दल रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here