भिवंडीच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार बाळ्या मामा मात्रे यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे आग्रही मागणी

0
10

नवी दिल्ली | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदारांच्या शिष्टमंडळासह भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळ्या मामा मात्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेत भिवंडी आणि परिसरातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले.

यावेळी खासदार मात्रे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील नागरिक, प्रवासी, व्यावसायिक आणि स्थानिक भूमिपुत्रांशी संबंधित विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांकडे सादर केले. भिवंडीतील ग्राहक व व्यापाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन टोरेंट पॉवरची सेवा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच मुरबाड परिसराच्या दळणवळण विकासासाठी कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
भिवंडीतील हजारो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी भिवंडी लोकल सेवा तात्काळ सुरू करावी, तसेच बदलापूर रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करून प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी आग्रही विनंती खासदार बाळ्या मामा मात्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here