राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत नवी मुंबईतील ३,७०३ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

0
10

नवी मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘बाल चित्रकला स्पर्धे’त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या कल्पनाशक्तीचे रंगीत दर्शन घडविले. या स्पर्धेत नवी मुंबईतील विविध माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील तब्बल ३,७०३ विद्यार्थी सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणे, त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणे या उद्देशाने राज्यभरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नमुंमपा शिक्षण विभागाच्या आवाहनाला विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. शासनाच्या निर्देशानुसार स्पर्धेचे विषय स्पर्धेच्या वेळीच जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून विविध विषयांवर आकर्षक चित्रे साकारत परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव १४ नोव्हेंबर २०२६ रोजी बालदिनानिमित्त करण्यात येणार आहे. स्पर्धेदरम्यान शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी आणि केंद्र समन्वयक यांनी विविध केंद्रांना भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मक अभिव्यक्तीला नवे व्यासपीठ मिळाले असून बालचित्रकारांच्या सर्जनशीलतेचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here