रोहा येथील ब्लड बँक लवकरात लवकर सुरू करा- मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

0
4

रोहा, दि. १२ :
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आढावा घेतला. यावेळी रोहा येथील ब्लड बँकेचे काम तातडीने पूर्ण करून ती नागरिकांच्या सेवेसाठी खुली करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रलंबित कामांना गती देण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री तटकरे यांनी यावेळी नमूद केले. ब्लड बँकेसारखी महत्त्वाची सुविधा कार्यान्वित झाल्यास रोहा तालुक्यासह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी ब्लड बँकेचे बांधकाम आणि इतर आवश्यक कामे जवळपास पूर्ण झाल्याची माहिती दिली. आवश्यक यंत्रसामग्रीची उपलब्धता, तांत्रिक पूर्तता आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून ब्लड बँक लवकरच नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विकासकामांचा आढावा घेताना मंत्री तटकरे यांनी नागरिकांच्या हिताशी संबंधित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचनाही दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here