महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर
अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला
मुंबई :
महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील SIR मोहिमेअंतर्गत विविध टप्प्यांसाठी सुधारित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मतदान केंद्रांचे सूत्रीकरण २४ ऑगस्ट २०२६ रोजी पूर्ण करण्यात येणार आहे.
यानंतर प्रारूप मतदार यादीचे प्रकाशन ३१ ऑगस्ट २०२६ रोजी होईल. प्रारूप मतदार यादीवर दावे आणि हरकती नोंदविण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे.
तसेच नोटीस तसेच दावे आणि हरकती निकाली काढण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ असा राहणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
मतदारांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले नाव, मतदार केंद्र आणि मतदार यादीतील तपशील तपासून घ्यावेत. नाव किंवा तपशिलाबाबत काही त्रुटी आढळल्यास निर्धारित कालावधीत दावे अथवा हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
SIR मोहिमेचे सुधारित वेळापत्रक
मतदान केंद्रांचे सूत्रीकरण : २४ ऑगस्ट २०२६
प्रारूप मतदार यादीचे प्रकाशन : ३१ ऑगस्ट २०२६
दावे व हरकतींचा कालावधी : ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६
नोटीस तसेच दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी : ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६