श्री बाळूमामांच्या दर्शनाची ओढ आता घेऊन जाईल थेट पणजीपर्यंत; आदमापूर-पणजी एसटी सेवा सुरू

0
13

आदमापूर :
श्री बाळूमामांच्या दर्शनासाठी तसेच कोकण-गोवा प्रवासासाठी जाणाऱ्या भाविक व प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आदमापूर ते पणजी मार्गावर एसटी बससेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे तीर्थाटनाचा प्रवास अधिक सुरक्षित, सोपा आणि सुखकर होणार आहे.
या बससेवेच्या मार्गात कोल्हापूर, कळंबा, इचलकरंजी, शेलवाडी, बिद्री, आदमापूर, गारगोटी, कडगाव, आजरा, आंबोली, सावंतवाडी, बांदा, म्हापसा आणि पणजी या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.
प्रवासादरम्यान श्री बाळूमामांच्या दर्शनासाठी आदमापूर येथे जाता येणार असून, पुढे गोव्याच्या पणजीपर्यंत एसटीने प्रवास करता येणार आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी ही सेवा विशेष सोयीची ठरणार आहे.
उपलब्ध वेळापत्रकानुसार कोल्हापूरहून सकाळी १० वाजता, आदमापूरहून सकाळी ११.१५ वाजता आणि गारगोटीहून दुपारी १२ वाजता बस सुटणार आहे. तसेच पणजीहून सकाळी ८.२० वाजता बससेवा उपलब्ध असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
सुरक्षित आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या सेवेमुळे भाविक, पर्यटक, विद्यार्थी तसेच नियमित प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. ‘आपला प्रवास… आमची जबाबदारी!’ या भावनेतून एसटी महामंडळाची ही सेवा प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here