‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानांतर्गत ‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रमाचा शुभारंभ
‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानांतर्गत ‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रमाचा शुभारंभ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तीन मुख्याध्यापकांना प्रातिनिधिक स्वरूपात पत्र प्रदान
नवी मुंबई :
विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित आणि व्यसनमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानांतर्गत ‘कॅम्पस कनेक्ट’ या विशेष उपक्रमाचा शुभारंभ नेरूळ येथे करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात तीन मुख्याध्यापकांना पत्र प्रदान करण्यात आले.
पत्र स्वीकारणाऱ्यांमध्ये प्रा. डॉ. बासुकीनाथ पांडे — RGC कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, वाशी, प्रा. डॉ. पूर्वी पुजारी — विजय पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट, नेरूळ आणि प्रा. निशा नायर — रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय, खारघर यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे. महाविद्यालये व शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
**‘ड्रग फ्री कॅम्पस’**च्या माध्यमातून जनजागृती, प्रतिबंध आणि सहभागाला बळ देत नशामुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी शासनासोबत शैक्षणिक संस्था, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि समाजातील विविध घटकांनी एकजुटीने पुढे येण्याची गरज आहे.
‘कॅम्पस कनेक्ट’च्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि निरोगी भविष्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे.