मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
स्पर्धकांना सहभागाची संधी; आकर्षक रील्सच्या माध्यमातून मृद व जलसंवर्धनाचा संदेश देण्याचे आवाहन
मुंबई :
मृद व जलसंवर्धनाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धे’ला ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणखी संधी उपलब्ध झाली आहे.
मृदा धूप रोखणे, पाण्याचे संवर्धन, पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन, जलसंधारणाच्या विविध उपाययोजना तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणाऱ्या कल्पक रील्स स्पर्धकांनी तयार कराव्यात, असा उद्देश या स्पर्धेमागे आहे.
सोशल मीडियाच्या प्रभावी माध्यमातून मृद व जलसंवर्धनाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे. इच्छुकांनी वाढीव मुदतीचा लाभ घेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.