घाटकोपरमध्ये ‘महा रक्तदान शिबिर’; मुंबई महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट

0
10

जिग्नेश खिलानी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम; रक्तदात्यांचे केले कौतुक

मुंबई :
खिलानी फाउंडेशन आणि कच्छ युवक संघ, घाटकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने २३ ऑगस्ट २०२६ रोजी घाटकोपर येथे ‘महा रक्तदान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले. श्री. जिग्नेश खिलानी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या रक्तदान शिबिरास मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी सदिच्छा भेट देऊन आयोजक आणि रक्तदात्यांचे कौतुक केले. रक्तदात्यांचा उत्साह वाढवत त्यांनी सर्व रक्तदात्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.
‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे महापौर रितू तावडे यांनी विशेष कौतुक केले. वाढदिवसासारखा वैयक्तिक आनंदाचा दिवस समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करणे ही प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
रक्तदानामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनीही नियमित रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here