कराडमध्ये मराठी भाषा विभागाची साहित्यिक व अभ्यासकांसोबत सकारात्मक बैठक

0
9
कराडमध्ये मराठी भाषा विभागाची साहित्यिक व अभ्यासकांसोबत सकारात्मक बैठक
कराडमध्ये मराठी भाषा विभागाची साहित्यिक व अभ्यासकांसोबत सकारात्मक बैठक

कराडमध्ये मराठी भाषा विभागाची साहित्यिक व अभ्यासकांसोबत सकारात्मक बैठक

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ देण्यावर सखोल चर्चा

कराड :
हॉटेल विट्स, कराड येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये मराठी भाषा विभाग आणि सातारा-कराड परिसरातील मान्यवर साहित्यिक व भाषा अभ्यासक यांची सविस्तर व सकारात्मक बैठक पार पडली. यावेळी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच मराठी भाषेचे संवर्धन, प्रसार आणि विकासासाठी विविध उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना सांगण्यात आले की, सातारा आणि कराड ही संतांची, क्रांतीची आणि साहित्याची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह या भूमीतील अनेक विचारवंतांच्या समृद्ध वैचारिक वारशाचा महाराष्ट्राला लाभ झाला आहे.
या मातीतील साहित्यिकांचे प्रश्न, अडचणी आणि मराठी भाषेच्या प्रसारासाठी मराठी भाषा विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. साहित्यिकांचा सन्मान करणे, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नव्या पिढीमध्ये मराठी वाचनाची आवड निर्माण करणे यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
“मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, तर आपली अस्मिता आणि आपला श्वास आहे,” असे सांगत आजच्या डिजिटल युगात आणि इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचे नमूद करण्यात आले.
मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम खेड्यापाड्यांपासून तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महायुती शासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी आश्वस्त करण्यात आले.
बैठकीला मराठी भाषा विभागाचे संचालक शामकांत देवरे यांच्यासह सातारा आणि कराड परिसरातील अनेक नामवंत साहित्यिक, भाषा अभ्यासक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here