नवी मुंबईत गणेशोत्सव नियोजनासाठी आज समन्वय बैठक

0
12
नवी मुंबईत गणेशोत्सव नियोजनासाठी आज समन्वय बैठक
नवी मुंबईत गणेशोत्सव नियोजनासाठी आज समन्वय बैठक

नवी मुंबईत गणेशोत्सव नियोजनासाठी आज समन्वय बैठक

नवी मुंबई :
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात यंदाचा गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव सुव्यवस्थित व सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी विविध संबंधित प्राधिकरणे आणि सार्वजनिक उत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची समन्वय बैठक मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित करण्यात आली आहे.
महापौर सुझाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
यंदा १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव, तर ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नवरात्रौत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना, मंडप व स्टेज परवानगीची सुलभ प्रक्रिया, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच इतर अनुषंगिक बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीस नवी मुंबई महानगरपालिका, पोलीस, वाहतूक पोलीस, सिडको, एमएसईडीसीएल, आरटीओ आणि एमपीसीबी या संबंधित प्राधिकरणांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा एक पदाधिकारी किंवा प्रतिनिधी बैठकीस उपस्थित राहणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, ज्ञानकेंद्र, तिसरा मजला, किल्ले गावठाणसमोर, सेक्टर १५ ए, सीबीडी बेलापूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here