निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी महाराष्ट्राचे लोकायुक्त म्हणून घेतली शपथ

0
8

मुंबई :
मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी महाराष्ट्राचे लोकायुक्त म्हणून शपथ घेतली. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी त्यांना लोकायुक्त पदाची शपथ दिली.
ऑक्टोबर २०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची आता राज्यातील महत्त्वाच्या घटनात्मक पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे न्यायालयीन सेवेनंतर ते पुन्हा एका महत्त्वाच्या सार्वजनिक जबाबदारीवर आले आहेत.
उच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांची महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या (MSBCC) अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
लोकायुक्त म्हणून शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अनुभवाचा आणि प्रशासकीय व न्यायालयीन कार्याचा लाभ महाराष्ट्राच्या लोकायुक्त संस्थेला मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here