राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांची निवड

0
11
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांची निवड
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांची निवड

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांची निवड

नवी दिल्ली :
देशभरातील उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २१ अध्यापक-प्राध्यापकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुरस्कारार्थींची यादी जाहीर केली आहे.
या यादीत महाराष्ट्रातील डॉ. विक्रम विशाल (आयआयटी मुंबई), डॉ. संदीपान नरोटे (शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर) आणि डॉ. अमर ताकसांडे (जेएनएमसी, वर्धा) या तीन प्राध्यापकांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
अध्यापनातील गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम, संशोधन तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन दोन टप्प्यांच्या छाननी प्रक्रियेनंतर या प्राध्यापकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे विशेष पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन क्षेत्रातील अध्यापकांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करणाऱ्या या पुरस्कारामुळे देशभरातील शिक्षकांना गुणवत्तापूर्ण अध्यापन, संशोधन आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांसाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here