CEIR पोर्टलच्या मदतीने महाडमध्ये १० गहाळ मोबाईल फोन शोधले
CEIR पोर्टलच्या मदतीने महाडमध्ये १० गहाळ मोबाईल फोन शोधले
महाड :
महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गहाळ झालेल्या मालमत्तेच्या नोंदीतील एकूण १० मोबाईल फोन CEIR पोर्टलच्या माध्यमातून ट्रेस करण्यात पोलिसांना यश आले आहे.
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत पोलिसांनी गहाळ मोबाईल फोनचा शोध घेऊन ते त्यांच्या मूळ मालकांपर्यंत पोहोचविले. पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या हस्ते संबंधित मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालक तसेच तक्रारदारांना परत करण्यात आले.
गहाळ किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी CEIR (Central Equipment Identity Register) प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
या कारवाईमुळे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास आणि पोलिसांची तत्पर सेवा याचे उदाहरण समोर आले आहे.