शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वज्ञ होन्याळकर जिल्हा परिषद शाळांमधून प्रथम

0
10

ठाणे :
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ७ वी) २०२६ मध्ये जिल्हा परिषद शाळा, सोनारपाडा, ता. कल्याण येथील विद्यार्थी कु. सर्वज्ञ संजय होन्याळकर याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सर्वज्ञने ३०० पैकी २६४ गुण मिळवत जिल्हा परिषद शाळांमधून (मराठी माध्यम) प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच शहरी विभागातून (Urban General) त्याने चौथा क्रमांक मिळवला आहे.
या उल्लेखनीय यशानंतर सर्वज्ञने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांची भेट घेतली. यावेळी यादव यांनी सर्वज्ञचे अभिनंदन करून त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि मार्गदर्शन केले.
तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनीही सर्वज्ञचे अभिनंदन करून त्याच्या यशाचे कौतुक केले.
“ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास करा, नियमित सराव करा आणि स्पर्धेला सामोरे जा!” असा प्रेरणादायी संदेश सर्वज्ञने विद्यार्थ्यांना दिला आहे.
भविष्यात IAS अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सर्वज्ञच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here