देवघर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0
13

कुडाळ : देवघर धरणातील पाणीपातळी वाढल्याने दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून धरणातून वीज निर्मितीसाठी ६ क्युमेक्स विसर्गाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल-कुडाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
देवघर धरणाची कमाल पाणीपातळी १८७.५० मीटर असून सध्या धरणातील पाणीपातळी १८५.७० मीटर इतकी झाली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत मंजूर पाणीपातळी व विसर्गाचे नियमन करण्याच्या वेळापत्रकानुसार धरणातील पाणीपातळी १८५.६५ मीटरपर्यंत मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.
आगामी काळात पावसाची शक्यता लक्षात घेता धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्राबाहेरील पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणीही नदीपात्रात मिसळल्याने नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे दि. २८ ऑगस्टपासून पुढील कालावधीत नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह कधीही वाढू शकतो, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. नदीकाठच्या ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी नदीपात्रात उतरू नये तसेच जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here