नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आपत्कालीन हेल्पलाइन
माहिती नोंदविण्याचे आवाहन
मुंबई :
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध देशांतील तसेच महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती संकलित करून त्यांना तातडीने आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मंत्रालय, मुंबई यांच्या वतीने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.
नेपाळमध्ये नागरिक किंवा पर्यटक अडकले असल्यास त्यांच्या कुटुंबीयांनी किंवा नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीची सविस्तर माहिती प्रशासनाकडे नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
माहिती नोंदविण्यासाठी लिंक
🔗 geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/
आपत्कालीन संपर्क
📞 टोल-फ्री हेल्पलाइन : १०७७
📱 कंट्रोल रूम : +९१ ९३२१५८७१४३
📧 ईमेल : [email protected]
नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांनी विलंब न करता उपलब्ध माध्यमातून माहिती नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


