मोरा मच्छीमार कोळीवाड्यातील बाधित मच्छीमारांच्या नुकसानभरपाईसाठी आढावा बैठक

0
16

मुंबई :
जेएनपीएच्या चौथ्या कंटेनर टर्मिनलच्या विकासकामामुळे बाधित झालेल्या मोरा मच्छीमार कोळीवाडा सहकारी सोसायटी, मोरा येथील मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली.
मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस आमदार महेश बालदी, मत्स्यआयुक्त प्रेरणा देशभ्रतार तसेच मोरा मच्छीमार सहकारी सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जेएनपीएच्या चौथ्या कंटेनर टर्मिनलच्या विकासकामामुळे प्रभावित झालेल्या मच्छीमारांच्या नुकसानभरपाईच्या प्रश्नाबाबत आढावा घेण्यात आला. मच्छीमारांच्या मागण्या आणि संबंधित बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली.
दरम्यान, मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here