
मुंबई महापौर रितू तावडे यांनी बीएमसी कर्मचारी व कार्यकर्त्यांसोबत साजरे केले रक्षाबंधनाचे आनंदाचे क्षण
मुंबई :
सेवा, समर्पण आणि विश्वासाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी बीएमसी कर्मचारी आणि शिवडी विधानसभा मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांसोबत उत्साहात साजरा केला.

मुंबई शहराची अहोरात्र सेवा करणाऱ्या बीएमसी कर्मचाऱ्यांसोबत तसेच शिवडी विधानसभा मतदारसंघासाठी सदैव तत्पर असणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी रक्षाबंधनाचे आनंदाचे क्षण अनुभवले. यावेळी कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आणि जनसेवेत साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांप्रती त्यांनी आपुलकी व कृतज्ञता व्यक्त केली.
“शहराला सुरक्षित ठेवणारे हे हात आणि जनसेवेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सहकारी हीच माझी खरी ताकद आहे,” अशी भावना रितू तावडे यांनी व्यक्त केली. कर्तव्य आणि आपुलकीच्या रेशमी धाग्यांनी हे नाते अधिक दृढ झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी मुंबईकरांसह सर्वांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

