मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चाचडगाव येथील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

0
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चाचडगाव येथील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चाचडगाव येथील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चाचडगाव येथील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
नाशिक :
मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिकच्या कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, चाचडगाव, ता. दिंडोरी येथील नूतन इमारतीचे उद्घाटन आणि कोनशिला अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला शिक्षण, कृषी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने मुख्यमंत्री सहायता निधीस दिलेल्या या योगदानाचे यावेळी कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान संस्थेचे मुखपत्र असलेल्या ‘मविप्र पत्रिका’च्या गुणवंत अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची आणि कार्याची माहिती या माध्यमातून विद्यार्थ्यांसह समाजापर्यंत पोहोचविण्यात येते.
कृषी शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने कृषी महाविद्यालयाची नूतन इमारत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी शिक्षण, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा शैक्षणिक संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीष महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे, नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगिरी आहेर-आडके, आमदार सीमा हिरे, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर, आमदार दिलीप बोरसे, आमदार दिलीप बनकर, नाशिक महानगरपालिकेचे उपमहापौर विलास शिंदे उपस्थित होते.
तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवरांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here