नवी मुंबईत महिला मेळावा व मंगळागौर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

0
11
नवी मुंबईत महिला मेळावा व मंगळागौर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
नवी मुंबईत महिला मेळावा व मंगळागौर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

नवी मुंबईत महिला मेळावा व मंगळागौर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

पारंपरिक संस्कृती जपत महिला कलागुणांना प्रोत्साहन

नवी मुंबई :
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे आयोजित ‘महिला मेळावा’ आणि ‘मंगळागौर स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा’ वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात उत्साहात पार पडला.

या विशेष सोहळ्यास उपस्थित राहून महिलांचा उत्साह वाढवला, असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांना प्रोत्साहन देणे तसेच महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचा समृद्ध वारसा जपणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
मंगळागौर स्पर्धेत विविध गटांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेत्या महिलांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला. विजेत्यांना पारितोषिके प्रदान करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमस्थळी महिला उद्योजिकांनी साड्या, दागिने तसेच विविध कलात्मक वस्तूंचे आकर्षक स्टॉल्स उभारले होते. या स्टॉल्सना प्रत्यक्ष भेट देऊन महिलांनी साकारलेल्या कलाकुसरीचे कौतुक करण्यात आले. महिला उद्योजिकांच्या मेहनतीला प्रोत्साहन देत त्यांच्या व्यवसायाला पाठबळ देण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांच्या अपार उत्साहामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्सवी वातावरण लाभले. महिला कलागुणांना प्रोत्साहन देतानाच पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि महिला उद्योजकतेला चालना देणारा हा उपक्रम ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here