भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक उत्साहात
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक उत्साहात
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली.
या बैठकीस विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार, भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पक्ष संघटन, आगामी राजकीय रणनीती आणि राज्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.