शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. (सामाजिक शास्त्रे) अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू
शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. (सामाजिक शास्त्रे) अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत एम.ए. (सामाजिक शास्त्रे) अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एम.ए. (सामाजिक शास्त्रे) अंतर्गत इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र हे विषय उपलब्ध आहेत.
या अभ्यासक्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे UGC-DEB मान्यता, लवचिक वेळेनुसार अभ्यासाची सुविधा, तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन, माफक शुल्क तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी होणारा उपयोग.
कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.