महाभूमी स्टॅक प्रणालीचा प्रारंभ; राज्यातील जमीनमालकीची माहिती एका क्लिकवर

0
4
महाभूमी स्टॅक प्रणालीचा प्रारंभ; राज्यातील जमीनमालकीची माहिती एका क्लिकवर
महाभूमी स्टॅक प्रणालीचा प्रारंभ; राज्यातील जमीनमालकीची माहिती एका क्लिकवर

महाभूमी स्टॅक प्रणालीचा प्रारंभ; राज्यातील जमीनमालकीची माहिती एका क्लिकवर

मुंबई :
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या ‘महाभूमी स्टॅक’ या एकात्मिक डिजिटल प्रणालीचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.
‘महाभूमी स्टॅक’ प्रणालीमुळे राज्यातील जमिनींच्या मालकीहक्कासंदर्भातील माहिती नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या डिजिटल सुविधेमुळे जमीनविषयक व्यवहार अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान होऊन राज्यातील गुंतवणूक तसेच आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये तसेच व्यवहारानंतर नागरिकांना महाभूलेख, महाभूनकाशा, आयडीआरएस यांसारख्या विविध डिजिटल प्रणालींचा वापर करावा लागत होता. या विखुरलेल्या प्रणालींचे एकत्रीकरण करून दहा प्रमुख भूमी सेवा श्रेणींसाठी एकच एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार ‘महाभूमी स्टॅक’च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. महसूल आणि जमीनविषयक सुधारणांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाभूमी स्टॅक : डिजिटल अभिलेखांचे भांडार

  • ३.५ कोटींहून अधिक अधिकार अभिलेख — ७/१२ व ८-अ
  • १.५ कोटीहून अधिक भू-नकाशे व मिळकत पत्रिका
  • ४० कोटींहून अधिक ऐतिहासिक स्कॅन केलेले फेरफार व जुने अभिलेख
  • नोंदणी विभागातील दस्त क्र. २ च्या प्रती
  • महसूल न्यायालयीन प्रकरणांची अद्ययावत स्थिती
या प्रणालीमुळे नागरिकांना जमीनविषयक विविध अभिलेख आणि सेवांचा एकाच ठिकाणी डिजिटल पद्धतीने लाभ घेता येणार असून, जमीन व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता आणि सुलभता निर्माण होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here