एसटी प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड आवश्यक

0
4
एसटी प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड आवश्यक
एसटी प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड आवश्यक

एसटी प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड आवश्यक

ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांनी नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन

मुंबई :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासासाठी १ सप्टेंबर २०२६ पासून NCMC कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्या वतीने प्रवाशांना NCMC कार्ड सोबत ठेवण्याचे आणि आवश्यक असल्यास कार्डमध्ये टॉप-अप करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात आतापर्यंत १ कोटी ११ लाख ७८ हजार ९० नागरिकांनी NCMC कार्डसाठी नोंदणी पूर्ण केली आहे. NCMC कार्डच्या माध्यमातून एसटी प्रवासातील व्यवहार अधिक सुलभ आणि डिजिटल पद्धतीने करण्याचा प्रयत्न महामंडळाकडून करण्यात येत आहे.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी NCMC कार्ड सोबत ठेवावे, तसेच आवश्यक टॉप-अप करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. काही तांत्रिक किंवा नोंदणी प्रक्रियेतील अडचणींमुळे ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना नोंदणीसाठी काही कालावधीची सवलत देण्यात आल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी NCMC कार्डची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here