कुक्कुटपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक
कुक्कुटपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत कुक्कुटपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्यात आल्यानंतर संबंधित शासन निर्णयाची प्रत्यक्ष आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला.
कुक्कुटपालन व्यवसायिकांना शासनाच्या विविध योजना व सवलतींचा प्रभावी लाभ मिळावा, तसेच या व्यवसायाच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक व उद्योजकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
या बैठकीस पदुमचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यआयुक्त भानुदास पालवे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), तसेच संजय सावंत, योगेश बेळणेकर, श्रीपाद तवटे, सुनील धुरी, रमेश म्हाडगुत, प्रशांत म्हाडगुत, वारंग यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुक्कुटपालन व्यवसायिक उपस्थित होते.