गणेशोत्सवात महामार्गावरील प्रवास होणार सुरक्षित; ‘Black Spot RTO Panvel’ ॲपचा वापर करण्याचे आवाहन

0
39

मुंबई :
गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे, मुंबई-गोवा तसेच कोकणाकडे जाणाऱ्या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी ‘Black Spot RTO Panvel’ या विशेष मोबाईल ॲपचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या ॲपच्या माध्यमातून प्रवासादरम्यान येणारी अपघातप्रवण ठिकाणे, धोकादायक वळणे आणि ब्लॅक स्पॉटची पूर्वसूचना मिळणार आहे. वाहन ब्लॅक स्पॉटकडे जात असताना ॲपद्वारे अलर्टही देण्यात येतो. हे ॲप Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक कोकणासह विविध ठिकाणी प्रवास करतात. त्यामुळे प्रवासापूर्वी हे ॲप डाऊनलोड करून मार्गातील धोकादायक ठिकाणांची माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहनचालकांनी वेग मर्यादित ठेवावा, धोकादायक ओव्हरटेकिंग टाळावे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट तर चारचाकी वाहनातील प्रवाशांनी सीटबेल्टचा वापर करावा. तसेच मद्यपान करून वाहन चालवू नये. प्रवासादरम्यान थकवा जाणवल्यास वाहन थांबवून पुरेशी विश्रांती घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
“बाप्पाच्या आगमनाचा आनंद द्विगुणित करा… सुरक्षित वाहन चालवा आणि कुटुंबासह सुरक्षित घरी पोहोचा,” असा संदेश वाहनचालकांना देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here